मोदींवर अब्रुनुकसानीचा दावा करणार ; कॉंग्रेस नेत्या संतापल्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मार्च २०२३ ।  देशातील कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर आज लोकसभा सचिवालयाने खासदारकि रद्द केल्यानंतर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. आपण दावा केल्यानंतर न्यायालयात किती वेगाने हालचाली होतात, तेही पाहणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी संताप व्यक्त केला आहे.

रेणुका चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 2018मध्ये संसदेत राज्यसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेणुका चौधरी यांना शूर्पणखा म्हटलं होतं. त्याचा उल्लेख करत चौधरी यांनी एक छोटी व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. त्यात नरेंद्र मोदी हे राज्यसभेच्या अध्यक्षांना उद्देशून ‘रेणुका चौधरी यांनी असेच विनोद करत राहावेत कारण रामायण बंद झाल्यापासून असे विनोद ऐकले नाहीत’, असं म्हणताना दिसत आहेत. ही क्लिप 7 फेब्रुवारी 2018ची आहे. राज्यसभेला संबोधित करताना विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपावर नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली होती.

या क्लिपसोबत त्यांनी कॅप्शनही दिली आहे. मी शूर्पणखा या शब्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. आता मला पाहायचं आहे की, न्यायालय त्यावर किती वेगाने कारवाई करतं, असं चौधरी म्हणाल्या आहेत. तसंच, राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांसमोर गुडघे टेकायला नकार दिला. फॅसिझमविरुद्ध लढा थांबवण्यास नकार दिला. त्यांनी खरं बोलणं थांबवलं नाही, असं रेणुका चौधरी म्हणाल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम