
मराठी बिग बॉसच्या घरात तेजस्विनी व अमृता धोंगडे आखणार नवी खेळी ?
दै. बातमीदार । २ नोव्हेबर २०२२ मराठी बिग बॉसच्या घरात आता सदस्यांना डोकं, ताकद सगळंच वापरावं लागणार आहे. कारण आता पुढे कठीण टास्क येत आहे. आता तर सदस्यांना आज बिग बॉस यांनी “खुल्ला करायचा राडा” हे कार्य सदस्यांवर सोपवले आहे. आणि त्याचसाठी तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी खेळी आखताना दिसणार आहेत.
बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता चार आठवडे झाले. टास्क, वाद भांडण आणि राडे यांचे सत्र सुरूच आहे. कुरघोडी, एकमेकांवर गेम करणे हे सुरूच आहे. सध्या बिग बॉसच्या घरात स्नेहलता वसईकरची वाइल्ड कार्ड एंट्री झाली असल्याने नवे समीकरण तयार होत आहे. या आठवड्याच्या शेवटी कदाचित दोन टीमच्या तीन टीम झालेल्या दिसतील. प्रत्येकजण स्वतःची वेगळी खेळी खेळत आहे. यामध्ये आता अमृता धोंगडेची टीम जरा कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे अमृता आणि तेजस्विनी अपूर्वा नेमळेकरच्या टीमला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशी खेळी ते आज खेळणार आहेत.
तेजस्विनी अमृताला सांगताना दिसणार आहे, ‘आता सगळं सामान इकडेतिकडे आहे. तू जे तेल बोलते ना ते वापरूया पण… अमृता म्हणाली, आतून सामान आणण्यासाठी आपण यशश्रीला ठेवण्याचा प्रयत्न करूया. तेजस्विनीचे म्हणणे आहे, खाली कोणी तरी लागणार आत वेगळा माणूस नाही जाऊ शकतं. अमृताचे म्हणणे आहे, तू नसशील तेव्हा मी असेनच ना आणि मग तू संचालक व्हायचं. कोण आत जाणार ? कोण सामान आणणार ? कोण टार्गेट करणार ? याविषयीच्या चर्चा दोघींमध्ये सुरू आहेत. त्यामुळे टास्क जिंकण्याच्या दृष्टीने त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम