महाविकास आघाडीत पडणार मोठ्या पक्षाची भर ?
दै. बातमीदार । १५ मे २०२३ । देशातील कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेल्या भरघोस यशानंतर आत राज्यातील महाविकास आघाडीची ताकद वाढायला लागली आहे. राज्यातील महाविकास आघाडी यात देशातील मोठा पक्ष असलेल्या पक्षाच्या नेत्याने देखील राज्यात महाविकास आघाडीत येण्याचे मोठे विधान केले आहे.
भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी आम्ही कसलीही आणि कुठेही कुर्बानी देण्यासाठी तयार असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. नेमकं काय म्हणाले जलील?
आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी आम्ही कसलीही आणि कुठेही कुर्बानी देण्यास तयार असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदींना वाटतं की तेच कायमस्वरूपी पंतप्रधान राहणार आहेत. मात्र न्यूटनचा एक नियम आहे, जी वस्तू वर जाते ती तेवढ्याच वेगानं खाली देखील येते. मात्र मोदी खाली येईपर्यंत देशाचं मोठं नुकसान झालेलं असेल, असा घणाघात जलील यांनी केला आहे. दरम्यान दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती केली आहे. मात्र अद्यापही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत एन्ट्री मिळालेली नाहीये. त्यामुळे एमआयएमला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम