परीक्षा न घेता मिळतोय महिन्याला लाखो पगार उद्या अंतिम मुदत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ मार्च २०२३ ।देशातील तरुणांना अनेक क्षेत्रात मोठा रोजगार निर्माण होत आहे. त्यातच गेल इंडिया लिमिटेडने (GAIL) विविध ट्रेडमध्ये 47 एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. याठीकानी लाखो रुपये पगार दिला जातोय.

ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते गेलच्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. GAIL मध्ये नोकरी करू इच्छिणारे उमेदवार 15 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही पदं सिव्हिल, केमिकल, बीआयएस आणि गेलटेल टीसी/टीएम अशा विविध ट्रेडमध्ये भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड GATE-2023 च्या गुणांच्या आधारे केली जाईल.

GAIL भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 14 फेब्रुवारी 23 अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख- 15 मार्च 23
भरावयाच्या पदांची संख्या एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) – 20 पदे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हिल) – 11 पदे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (गेलटेल) – 8 पदे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (बीआयएस) – 8 पदे एकूण पदांची संख्या – 47 पदे

शैक्षणिक पात्रता काय एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल): किमान 65% गुणांसह केमिकल/पेट्रोकेमिकल/केमिकल टेक्नॉलॉजी/पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजीमधील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केलेली असावी. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हिल): किमान 65% गुणांसह सिव्हिलमधील इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केलेली असावी. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (बीआयएस)): किमान 65% गुणांसह कम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरींगची डिग्री किंवा किमान 60% गुणांसह बॅचलर डिग्री आणि किमान 65% गुणांसह कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये (MCA) 3 वर्षे मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे.

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (गेलटेल टीसी/टीएम): किमान 65% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशनमधील इंजिनीअरींगची डिग्री असणं आवश्यक आहे.

GAIL साठी वयोमर्यादा सर्व विषयातील एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी 15 मार्च रोजी कमाल वयोमर्यादा 26 वर्षे असावी. अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांसाठी वयाची अट 05 वर्षे आणि OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांसाठी 3 वर्षे शिथिल करण्यात आली आहे. निवडीनंतर मिळणारे वेतन निवडलेल्या उमेदवारांना E-2 ग्रेडमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून एक वर्षाच्या ट्रेनिंग कम प्रोबेशन पीरियडमध्ये 60,000 – 1,80,000/ रुपयांच्या मूळ वेतनावर 60,000/- च्या वेतनश्रेणीत ठेवले जाईल. ट्रेनिंग व प्रोबेशन पीरियडनंतर त्यांना E-2 ग्रेड अंतर्गत 60,000 – 1,80,000/- वेतन दिले जाईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम