कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती निवडणुकीसाठी सज्ज रहावे :आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ नोव्हेबर २०२२ शिंदे – फडणवीस सरकारमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हे समजतच नाही, हे सरकार कोसळणारच तर कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी केले आहे. मविआने दिलेली वचने पूर्ण करून दाखवली होती, या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केले का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. आमदार नितीन देशमुख हे सुरतवरुन गुवाहटीला गेले नाही, ज्यांच्यात हिंमत नव्हती ते गुवाहटीला पळून गेले, असा टोला आदि्त्य ठाकरेंनी 40आमदारांना लगावला आहे. आज हे 40 गद्दार डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

तर आमच्या चेहऱ्यावर लपवण्यासारखे काही नाही, पण मुख्यमंत्री गद्दारीचा शिक्का माथ्थ्यावर घेऊन फिरताय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. सध्या राजकीय फटाके खूप फोडले जात आहेत, आमदारांना लग्नात गेले की लोक खोक्याचा हिशोब मागतात असा टोला बच्चू कडूंना लगावलाय.

सरकारने शेतकऱ्यांना काय दिले
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असताना या सरकारने काय दिले असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला असून, राज्याचे कृषीमंत्री कोण आहेत, असा सवालही उपस्थित केला आहे. आमचे सरकार असते तर आतापर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला असता असे म्हणताना तर उद्योग मंत्री काय उद्योग करतात असा घणाघाती टोला आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांना लगावला आहे.

लग्नातही लोक खोक्याचा हिशोब मागतात
शिंदे गट आणि भाजपचे नेते खुर्च्या सोडायला तयार नाही, ओला दुष्काळ जाहीर करावा नाही तर खुर्च्या खाली कराव्या ही मागणी आम्ही कायम असणार आहे. पण हे आमदार लग्नात गेले की लोक खोक्याचा हिशोब मागतात अशी, टीका रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यावर केली आहे. तर राज्यात बंटी आणि बबली खूप झाले आहेत, असा टोला ही राणांना लगावलाय. आगामी निवडणुकीत गद्दारांनी जिंकूण दाखवावे असे आव्हानही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी 40 आमदारांना दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम