भडगाव तालुक्यातील पहिलवानांचे नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश
भडगाव (वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय,नाशिक तर्फे बलकवडे व्यायामशाळा,भगूर जि.नाशिक येथे आयोजित १४ व १९ वर्षाआतील मुला-मुलींच्या शालेय कुस्ती स्पर्धेत भडगाव तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील पहिलवानांनी उत्तम कामगिरी केली.
यशस्वी पैलवान त्यांच्या शाळा व मार्गदर्शक
स्व.कमलताई पाटील माध्यमिक विद्यालय,पळासखेडे येथील पैलवान स्वराज प्रल्हाद चौधरी याने १४ वर्षाआतील ५२ किलो वजनी गटात प्रथमस्थान पटकाऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तसेच ब.ज.हिरण,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कजगाव येथील पैलवान देवेंद्र पंडित महाजन याने १४ वर्षाआतील ४८ किलो वजनी गटात उपविजेतेपद प्राप्त केले आहे.
१९ वर्षाआतील मुलींच्या ५५ किलो वजनी गटात गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाय,कोळगाव येथील पैलवान कु.पायल दौलत पाटील,हिने उपविजेतेपद प्राप्त केले तर त्याच वयोगटात मुलांमध्ये त्याच शाळेच्या जय आत्माराम बिऱ्हाडे याने ६१ किलो वजनी गटात तृतीय स्थान प्राप्त केले तर सौ.ज.ग.पुर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय,भडगाव येथील पैलवान वैभव गरबड बोरसे याने १९ वर्षाआतील ६३ किलो ग्रीकरोमन कुस्ती प्रकारात तृतीयस्थान प्राप्त केले आहे.
स्पर्धेतील यशस्वी सर्व पैलवानांना भडगाव तालुका क्रीडा संयोजक प्रा.डॉ.सचिन भोसले,मुख्याध्यापक तसेच कुस्ती पंच संजीव पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.सतीश पाटील,अरुण राजपूत,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी,पैलवान अनिल बिऱ्हाडे,पैलवान प्रल्हाद चौधरी,पैलवान पंडीत महाजन,पैलवान कैलास सोनवणे,क्रीडा शिक्षक गंभीर पाटील,क्रीडा शिक्षक अमोल पाटील आदिंचे मार्गदर्शन लाभले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम