बातमीदार | दि २९ डिसेंबर २०२३
यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षापासून अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक म्हणजे रक्तदान, अवयवदान व देहदान चळवळ, या चळवळीचा रथ सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने, सर्व दात्यांच्या उदांत्त हेतूने आज पर्यंत ओढला जात आहे.
रक्तदान हे महानदान, सर्वश्रेष्ठदान आहे कारण रक्तदाता हा जातपात, धर्म, पंथ याचा विचार न करता रक्तदान करीत असतो. रक्तदान करणारा माणूस हा माणूसकी असलेला माणूस असतो. कारण रक्तदान केल्यानंतर ते रक्त कोणत्या दात्याला दिले जाते हे आपल्याला माहीत नसतं म्हणूनच या दानाला सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.
जगातील रक्तदान हे असे दान आहे की हे आपण स्वतः तयार करतो आणि ये दान जेव्हा दुसऱ्याला देण्याचा उदात्त भाव आपल्या मनात तयार होतो तेव्हा मानसातल्या माणुसकीचे दर्शन होते.
आपल्या रक्तदानाने कोणाला तरी जीवनदान मिळणार आहे हा भाव असणारे सर्वश्रेष्ठ दानशुरांची म्हणजेच माणुसकी असलेल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी हाच प्रांजल उद्देश घेऊन ही चळवळ अविरत १० व्या वर्षात पर्दापण करत आहे.
आपणही या सर्वश्रेष्ठदानाच्या चळवळीत दि. १ जानेवारी २०२४ ठिकाण – यशोधन हॉस्पिटल जवळ नारायण वाडी चोपडा वेळ सकाळी ९ ते दुपारी ४वाजेपर्यंत रक्तदान करून या माणुसकीच्या चळवळीत सहभाग नोंदवून समाजाचे ऋण फेडण्याची संधी साधूया व ही चळवळ पुढे नेऊ या.
विसरू नका तुम्ही केलेल्या रक्तदानाने कोणालातरी नवीन जन्म, नवीन जीवन मिळणार आहे. असे आवाहन वंदे मातरम् परिवार चोपडा यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम