डांभुर्णी रस्त्यावर मधमाशांचा हल्ला; तडवी कुटुंबातील ९ जण जखमी

बातमी शेअर करा...

डांभुर्णी रस्त्यावर मधमाशांचा हल्ला; तडवी कुटुंबातील ९ जण जखमी

यावल | प्रतिनिधी
यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळील डांभुर्णी रस्त्यावर रविवारी घडलेल्या घटनेत मधमाशांनी तडवी कुटुंबावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात एकूण ९ जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किनगाव गावातून डांभुर्णी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत “पाच पीर बाबा” यांची दरगाह आहे. रविवारी तडवी कुटुंबीयांनी नवस फेडण्यासाठी दरगाह परिसरात गोड भाताचा स्वयंपाक सुरू केला होता. याच वेळी अचानक मधमाशांचा थवा त्यांच्या दिशेने आला आणि त्यांनी सर्वांवर हल्ला केला.

फरीदा जावेद तडवी, नर्गीस रफीक तडवी, जावेद रशीद तडवी, अर्श जावेद तडवी, हमिदा रफीक तडवी, रफीक मुबारक तडवी, अंजुम रुस्तुम तडवी, जोया रुस्तम तडवी, जिशान रफिक तडवी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम