राज्यात थंडीचा कहर ; इतके होणार तापमान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जानेवारी २०२३ । राज्यात गेल्या महिन्यापासून थंडीची लाट मोठ्या प्रमाणात वाढली असून आता संक्रातहि या थंडीमध्येच गेली. राज्यात पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील तीन दिवस मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज आहे. अनेक राज्यांमध्ये पारा कमालीचा घसरला आहे. राज्यभरात सरासरी 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. पुणे, नाशिकसह धुळे, जळगावमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात तापमानाचा पारा चांगलाच खाली गेला असून काही ठिकाणी दवबिंदू गोठले आहेत. जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसच्या खाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कडाक्याची थंडी अनुभवला मिळाली आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये कडाक्याची थंडी पडली असून तापमान कमी झाल्याने या भागातील शेतात आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवत तसेच वाहने घराच्या बाहेर ठेवल्या वस्तूवर असलेलं दवबिंदू गोठल्याचे दिसत आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे आणि वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम होत आहे. बहुतांश रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. सोमवारी दिल्लीतही या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये सोमवारी सफदरजंग परिसरात 1.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम