राजीनामा घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही ; गृहमंत्री फडणवीस !
दै. बातमीदार । ४ एप्रिल २०२३ । राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्याचे गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते त्याला लागलीच गृहमंत्री फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
गृहमंत्री फडणवीस आपल्या उत्तरात म्हणाले कि, राज्यात दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेले. मात्र, तुम्ही राजीनामा घेण्याची हिंमत दाखवली नाही. त्यांच्या भोवती लाळघोटेपणा केला. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे, ते नागपूरमध्ये बोलत होते. रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकली म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणून टीका केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरे म्हणजे माझा सवाल असा आहे की, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात, त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल त्यांनी केला. ज्यांच्या काळात पोलिस एक्सॉर्टशन करतात. आमचे तोंड उघडले तर त्यांची पळता भुई थोडी होईल. त्यामुळे संयमाने बोला. हा जो थयथयाट आहे, ते फर्स्टेशन असून, त्याला उत्तर देण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मोदींचे फोटो लावून निवडून येता. विरोधकांची लाळ घोटता. तेव्हा खरा फडतूस कोण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. याचे उत्तर त्यांना जनता देईल. मी पाच वर्षे राज्याच्या गृहमंत्री राहिलो आहे. पुन्हा गृहमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मात्र, मी गृहमंत्री पद सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम