तुम्हाला माहित नसेल आरोग्यासाठी लसणाचे किती फायदे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ ऑक्टोबर २०२२ । तुम्हाला जर नेहमी सर्दी खोकला होत असेल तर तुम्हाला डॉक्टर सांगतात की, सकस आहार घ्या. जास्त तेलकट, मसालेदार अन्न खाऊ नका. कारण, बरे हाण्यासाठी औषधाबरोबरच योग्य पौष्टीक आहार करणे गरजेचे आहे. हजारो वर्षांपासून आपल्या भारतात लसणाचा उपयोग जेवणात केला जातो. अनेक भाज्यांमध्ये, पदार्थांमध्ये लसणाची फोडणी दिली जाते.

लसणाचा वापर जवळपास सर्व पदार्थांमध्ये केला जातो. त्याची चव आणि सुगंध दोन्ही खूप उग्र आहेत. हे जेवणाला एक वेगळीच चव आणते. म्हणून बहुतेक लोक प्रत्येक पदार्थात लसणाचा वापर करतात. आयुर्वेदातही लसणाचा वापर केला जातो. लसणाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तसेच, त्याचे अनेक प्रकारही आहेत. यातील कोणत्या प्रकारचा लसूण खाण्यासाठी योग्य आहे. त्याचे गुणधर्म कोणते हे पाहुयात. हा लसणाचा सामान्य प्रकार असून तो बाजारात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. या लसणाच्या पाकळ्या बारिक मोठ्या असतात. या लसणाचे देठ मऊ असतात. त्यामुळे हा लसूण धाग्यात ओवूनही विकला जातो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम