दिवसातून इतक्या वेळेस टॉयलेटला जायला हव !
दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ सध्या देशातील काही भागात आजही लोकांना उघड्यावर शौचालयाच जावे लागत आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होवून अनेक आजार तयार होत आहे. १९ नोव्हेंबर वर्ल्ड टॉयलेट डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. वर्ल्ड टॉयलेट डे साजरा करण्यामागील उद्देश हाच आहे की लोकांना उघड्यावर शौचालयाच जाणे थांबविणे. सिंगापूरमध्ये राहणारे जॅक सिमने 19 नोव्हेंबर 2001 वर्ल्ड टॉयलेट ऑर्गेनाइजेशनची स्थापना केली होती. नंतर 2013 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने ऑफिशियली साजरा करण्याची घोषणा केली.
तुम्ही दिवसातून टॉयलेट कितीदा टॉयलेटला जाता? तुम्हाला माहिती आहे का की दिवसातून आपण कितीदा टॉयलेट जायला हवं? गरजेपेक्षा जास्त आणि गरजेपेक्षा कमी टॉयलेट जाणे शरिरासाठी हानिकारक असतं. अशात कितीदा टॉयलेट जावं, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
टॉयलेटला खरं तर लघूशंका आणि शौचासाठी जावं लागतं. टॉयलेटला कितीदा जावे हे यावप अवलंबून असतं की तुम्ही दिवसातून किती पेय पदार्थ पितात. टॉयलेट येणे हे ड्रिंकसोबत तुमचा बॉडी साईज, एक्सरसाइज, हायड्रेशन लेवल आणि दिवसभराच्या अॅक्टिव्हीटी आणि मेडीकल कंडीशन वर अवलंबून असतं. एक वयस्कर व्यक्तीने दर दोन अडीच तासानंतर टॉयलेट जाणे गरजेचे आहे. म्हणजेच 24 तासात 6-9 वेळा लघूशंकेला जावे. लंघूशंकेसाठी टॉयलेट जाणे हे खूप साधारण गोष्ट आहे. पण दिवसातून तुम्ही 6-9 वेळापेक्षा जास्त वेळा लघूशंकेला जात असाल तर हे चिंताजनक आहे.
यूएस नेशनल इंस्टीट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव अँड किडनी डिसिजनुसार एक प्रौढ व्यक्ती एका दिवसात 1.4 लीटर यूरिन निर्माण करतो. शरीराने 2 लीटर यूरिन प्रोड्यूस करावी. जर तुम्हाला वाटत असेल की लघूशंकेबाबत समस्या आहे तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि चेक अप करावा. अनेक लोक लघूशंका आल्यानंतरही टॉयलेट जात नाही. असं केल्याने तुम्हाला मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. जास्त वेळ लघूशंका थांबविल्याने तुमच्या ब्लॅडरमध्ये बॅक्टीरिया विकसित होतो जो अनेक गंभीर आजारांचं कारण बनवू शकतो. याशिवाय किडनी फेल होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे योग्य वेळ लघूशंकेला जाणे गरजेचे असते. शौचास कितीदा जावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 24 तासात केवळ एकदाच जावे. काही लोकांना तर दिवसातून दोनदा शौचास जाण्याची सवय असते पण हे चुकीचं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम