तुम्ही गोळवलकरांचा धिक्कार करून दाखवा ; जितेंद्र आव्हाड
दै. बातमीदार । २ जानेवारी २०२३ राज्यात हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर भाजपने राज्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन सुरु केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, संभाजी राजेंच्या नाजूक इतिहासात जाऊ नका नाही तर मोठा वाद निर्माण होईल. सावरकर आणि गोळवलकर यांच्या दृष्टीने संभाजी महाराज स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असा दावाच त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. आता भाजप याला कसे प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होत. त्यावरून त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. आता राष्ट्रवादीकडूनही अजित पवारांची पाठराखण केली जात आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट करून खळबळजनक दावा केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका मराठी आणि इंग्रजी पुस्तकांची दोन पानेही आव्हाड यांनी ट्विट केली आहेत. ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी ह्यांच्या बद्दल काय लिहून ठेवले ते वाचा. ह्या शूर विरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले. सावरकर आणि गोळवळकरांच्या दृष्टींनी संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते. कोणी बोलेल ह्याच्या वर’?
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम