
तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी केली ; कदम !
दै. बातमीदार । ६ मार्च २०२३ । काल ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथे विराट सभा झाली यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटाचे सर्वच नेत्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर लागलीच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आता ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आम्ही रामदास कदमच्या बालेकिल्ल्यात सभा घेतल्याचं समाधान फक्त त्यांनी घेतलं, असं रामदास कदम म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला मोठं केलं. तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या विचारांशी बेईमानी केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात. त्यामुळे खरी गद्दारी ही तुम्ही केली, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम