IRCTC चा मोठा प्लान तुम्ही घेणार 6 ज्योतिर्लिंगांचं दर्शन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ मे २०२३ ।  देशातील अनेक नागरिक देव दर्शानासाठी दर वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात अशा वेळी तुम्हाला मोठा खर्च देखील येत असतो. जर तुम्हाला कमी पैश्यात देवदर्शन करायचे असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल. तुम्हाला देशातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर IRCTC ने तुमच्यासाठी टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, नागेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता.

देशातील ही पाच प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत. हे टूर पॅकेज 20 मे पासून सुरू होत आहे. या टूर पॅकेजमध्ये हा प्रवास भारत गौरव स्पेशल टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. टूर पॅकेजविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

IRCTC चं हे टूर पॅकेज 10 दिवसांचं आहे. या टूर पॅकेजमध्ये ज्योतिर्लिंगाबरोबरच स्टॅच्यू ऑफ युनिटी, शिर्डी साईबाबा आणि शनी शिंगणापूरलाही पर्यटक भेट देणार आहेत. टूर पॅकेज कोलकाता येथून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या टूर पॅकेजमध्ये प्रवासी EMI द्वारेही भाडे भरू शकतात. या टूर पॅकेजमध्ये प्रवासी इकॉनॉमी क्लास (स्लीपर क्लास), स्टँडर्ड (थर्ड एसी क्लास) आणि कम्फर्ट (सेकंड एसी क्लास) क्लासमध्ये प्रवास करतील. टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना शाकाहारी जेवण दिले जाईल.
आयआरसीटीसीच्या इतर टूर पॅकेजप्रमाणे या टूर पॅकेजमध्येही प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था रेल्वेकडून केली जाणार आहे. या टूर पॅकेजसाठी इकॉनॉमी क्लासमध्ये 315 बर्थ आहेत. या बर्थमध्ये प्रति व्यक्ती भाडे रु. 20,060 आहे आणि या श्रेणीत प्रवास करणार्‍या प्रवाशांना नॉन एसी बजेट हॉटेलमध्ये राहायला मिळेल. स्टँडर्ड क्लासमध्ये तुम्हाला प्रति व्यक्ती भाडे 31,800 रुपये द्यावे लागतील. या श्रेणीतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसी हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल. त्याचप्रमाणे, कंफर्ट क्लासमध्ये प्रति व्यक्ती भाडे 41,600 रुपये आहे. या श्रेणीतील प्रवाशांना एसी हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल. प्रवासी हे टूर पॅकेज IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम