संस्कार इंग्लिश मेडियम स्कूल वडजी येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवक दिन साजरा

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

गिरणाई शिक्षण प्रसारक मंडळ वडजी संचलित संस्कार इंग्लिश मेडियम स्कूल वडजी ता.भडगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवक दिन वेशभुषेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कु. मृणाली गायकवाड ,तनिष्का पाटील ,यशस्वी पाटील, प्रणया पाटील,गायञी जाधव,तनुजा पाटील व कनक पाटील यांनी वेशभुषेसह राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषायी मनोगत व्यक्त केले. चि.हर्षल परदेशी, ध्रूप पाटील,श्रेयश पाटील,कुणाल चव्हाण ,तुषार चव्हाण ,समर्थ पाटील,रुद्र राठोड, समर्थ पाटील,मयुर पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. कुसुमताई शिवदास पाटील होते.पालक अरविंद जाधव ,प्राचार्य अनिल पाटील यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे केलेले कार्य सांगीतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल सोनवणे तर आभार सुषमा पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अनिल पाटील शिक्षिका सुषमा पाटील,कोमल सोनवणे,महेंद्र मोरे आदि शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम