रेल्वेखाली सापडुन तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ३ एप्रिल २०२४ । पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडुन पाचोऱ्यातील १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सामोरे आली आहे. सदर प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.

लोकेश संजय महाजन (वय १९, रा. संभाजी नगर, पाचोरा) सदार तरुण पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७० / १० नजीक धावत्या रेल्वेखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करून लोकेश महाजन याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.

सदर घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील हे करीत असून लोकेश संजय महाजन हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम