मंत्रालयात तरुणाचा प्रताप : नोकरीसाठी घेतली जाळीवर उडी
बातमीदार | २७ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक तरुण गेल्या काही वर्षापासून बेरोजगारीत असतांना अनेक तरुण शासकीय सेवेत कार्यात नोकरी करण्यसाठी अनेक शासकीय उंबरथे झिजवत आहे. न्यायासाठी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारण्याचे प्रमाण वाढत आहे. मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास रणजित आव्हाड या तरुणाने दुसऱ्या मजल्यावरील जाळीवर उतरत जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली.
पाझर तलाव प्रकल्पग्रस्त असूनही सरकारी नोकरी मिळत नसल्याने त्याने हे आंदोलन केले. कंत्राटी शिक्षक भरती बंद करा, अशी मागणी करीत त्याने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या. जाळीवर उतरलेल्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. त्याला ताब्यात घेऊन नरिमन पाइंट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रणजित आव्हाड हा नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावचा रहिवासी आहे. त्याची वडिलोपार्जित जमीन पाझर तलावासाठी राज्य सरकारने १९७५ साली संपादित केली आहे. त्याबदल्यात त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयातील कोणालाही शासकीय नोकरी अद्याप मिळालेली नाही. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रणजित सध्या कंत्राटी शिक्षक असल्याचे समजते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम