वडजी सोसायटीच्या चेअरमनपदी युवराज सुर्यवंशी तर व्ह्य.चेअरमनपदी गंगाराम राठोड यांची बिनविरोध निवड

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदि युवराज सुर्यवंशी तर व्ह्य.चेअरमन म्हणुन गंगाराम राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे चेअरमनपदाची ही दुसर्यांदा बिनविरोध निवड करून परंपरा कायम राखली गेली.

वडजी सोसायटीच्या चेअरमन बी.वाय.पाटील व व्ह्य.चेअरमन राजेंद्र पाटील यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल चेअरमन पदाची निवडणुक झाली. त्यात चेअरमन म्हणुन युवराज सुर्यवंशी तर व्ह्य.चेअरमनपदी गंगाराम राठोड यांची एकमताने निवड झाली. यावेळी माळवते चेअरमन बी.वाय.पाटील, व्ह्य.चेअरमन राजेंद्र पाटील, संचालक नाना परदेशी, संजय पाटील, रफुद्दिन शेख, राजेंद्र सोनवणे, रंगराव पाटील, लिलाताई पाटील, बेबाबाई पाटील, कमलबाई पाटील, प्रविण पाटील, माजी सभापती अभिमन पाटील, पत्रकार सुधाकर पाटील, नारायण पाटील, नगराज पाटील, शालिक पाटील, डाॅ.दिपक पाटील, बालु पाटील, नाना पाटील, समाधान पाटील, स्वदेश पाटील, प्रदिप पाटील, संजय परदेशी, नंदु पाटील, बाबाजी पाटील आदि उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एस.पाटील यांनी तर सहाय्यक म्हणून सचिव रविंद्र पाटील यांनी काम पाहीले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम