जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा नवा प्रताप ; व्हिडीओ झाला व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जुलै २०२३ ।  राज्यातील अनेक शाळा गेल्या दोन महिन्यापासून सुरु झाल्या आहेत. राज्यातील एका शाळेतील गुरुजींचे काही फोटो सोशल मिडीयावर आल्याने मोठी शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या शाळेतील असल्याचे समोर आले आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षक म्हणजे अगदी मुलांसाठी एक मोठा आदर्श असतात, मात्र त्यांनीच धक्कादायक कृत्य केलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा परिसरात ही घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेत एक गुरुजी चक्क टेबलवर झोपून फोनवर बोलत होते. बराच काळ उलटून गेला तरी या शिक्षकांना कोणतंही भान नव्हतं. टेबलवर झोपून पाय पसरुन फोनवर बोलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावातील एकाने व्हिडिओ काढल्या नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत गुरुजीची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वर्गात गोरगरीब विद्यार्थ्यांना हे असले गुरुजी खरंच शिकवत असेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान शाळेत झोपणाऱ्या या गुरुजीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम