अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा शेत शिवारातील विहिरीत आढळला मृतदेह*

बातमी शेअर करा...

सामरोद ता.जामनेर / प्रतिनिधी

सामरोद शिवारातील एका शेतात असलेल्या विहिरीत एका 14 वर्षीच्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

यबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील  या सामरोद गावातील 14 वर्षीय मुलगा सचिन पेठे हा दि. 11तारखेला सकाळी १० वा.गुरे चारण्यासाठी गेला असुन तो संध्याकाळ पर्यंत आला नाही. दुसर्या दिवशी दि.12 रोजी जामनेर पोलीस स्टेशनला मुलगा अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दि.14 रोजी पो.नि.शिंदे जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वान पथकाने सामरोद तसेच जंगल परिसरात तपास केला असता काही आढळून आले नाही. दि.20 आज रोजी सामरोद शिवारातील एका शेतात असलेल्या विहिरीत एका 14 वर्षीच्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. हा प्रकार शेतात कपाशी वेचण्याचे काम करणारे मजूर यांच्या लक्षात आल्यानंतर उघडकीला आला. या संदर्भात त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना बोलवून घटनेची माहिती सांगितली तसेच जामनेर पोलीस स्टेशन ला माहिती मिळताच पोलीस कर्मचारी देखील घटनांस्थळी तात्काळ दाखल झाले. हा मृतदेह सचिन पेठे याचा आहे ती ओळख पटली असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सामरोद शिवारातील घडलेल्या या घटनेने परिसरात जनतेकडून हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशन करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम