आदित्य ठाकरे यांचे जळगाव शहरात भव्य स्वागत

महापौर सौ. जयश्री महाजन"विजयी तलवार"भेट

बातमी शेअर करा...

 

 

 

 

जळगाव, ता.20 :युवकांचे प्रेरणास्थान, शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे शनिवार,दि.20 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंवाद यात्रेनिमित्त जळगाव सुवर्णनगरीत आगमन झाले असता शहरातील आकाशवाणी चौक येथे शिवसेना व युवासेनातर्फे तमाम निष्ठावंत शिवसैनिकांच्या व युवासैनिकांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आदित्य ठाकरे यांना दीड किलो वजनाची चांदीची ‘विजयी तलवार’ सस्नेह भेट दिली आदित्य ठाकरे यांना ही ‘विजयी तलवार’ कपाळाला लावत वंदन करुन मंचावरुन उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले.

 

याप्रसंगी शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, जळगाव महानगरपालिकेचे चाणक्य तथा माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीप्रमुख जाकीर पठाण यांच्यासह तमाम निष्ठावंत शिवसैनिक, युवासैनिक, महिला व युवा उपस्थित होते. ‘जय भवानी, जय शिवाजी, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ शिवसैनिकांच्या अशा घोषणांनी आकाशवाणी चौक परिसर दणाणले होते.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम