कजगावच्या प्रणव पवारची मुष्टियुद्ध स्पर्धेत देशपातळीवर निवड

कजगावच्या प्रणव पवारची मुष्टियुद्ध स्पर्धेत देशपातळीवर निवड कजगाव ता भडगाव येथील प्रणव कैलास पवार ह्या विद्यार्थ्याने मुष्टियुद्ध स्पर्धेत राज्यपातळीवर विजय मिळवल्याने त्याची देशपातळीवर निवड करण्यात आली आहे प्रणवयाने सतरा वर्ष वयोगटात व पंचावन्न किलो वजनात ही मुष्टियुद्ध स्पर्धा जिंकली आहे त्याने नागपूर विभागातील गोंदिया जिल्यातील स्पर्धकाला धुळचारून फायनल जिंकली आहे व आता राजस्थान मध्ये होणाऱ्या देशपातळीवरील २७ते३० जुलै पर्यंत होणाऱ्या मुष्टियुद्ध स्पर्धेत त्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे प्रणव याने यापूर्वीही कुस्ती स्पर्धेत विशेष प्राविण्य दाखवून राज्यपातळी पर्यंत मजल मारली होती मुष्टियुद्ध(ज्यूडो कुराश) हा खेळ प्रामुख्याने अपगानिस्थान देशात खेळला जातो व अपगानिस्थान हे मुष्टियुद्ध खेळाचे उगमस्थान मानले जाते व त्या देशाचा हा राष्ट्रीय खेळ मानला जातो प्रणव हा कजगाव येथील हिरण विद्यालयातील शिक्षक कैलास पवार यांचा चिरंजीव व एसटी महामंडळाचे कर्मचारी हिलाल पाटील यांचा भाचा आहे त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम