गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने शेती पिकांना भविष्यात फायदा

कजगाव ता भडगाव गेल्या काही दिवसांपासून गिरणा धरणात पाण्याची टक्केवारी वाढत होती आता धरण शंभर टक्के पूर्ण भरल्याने कजगाव सह गिरणा परीसरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर धरण भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त व्यक्त केल आहे जळगाव जिल्ह्यात गिरणा धरणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो विशेष करून चाळीसगाव भडगाव पाचोरा तालुक्यात ह्या नदीचे मोठे महत्व आहे त्यामुळे गिरणा परिसरातील नागरिकांचे गिरणा धरणाकडे विशेष लक्ष असते तसेच सलग तीन वर्षांपासून गिरणा शंभर टक्के भरत होते त्यामुळे अनेक ठिकाणी बागायत शेतीचे प्रमाण वाढले होते तसेच कजगाव सह अनेक गावांना गिरणा नदीवरून पाणी पुरवठा होत असतो त्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न ही जवळपास सुटला आहे गिरणा नदीवरून ज्या गावांना पाणी पुरवठा होत असतो त्यांनी ही समाधान व्यक्त केले आहे गिरणा धरण जुलै महिन्यातच शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अजून पावसाळा जवळपास दोन महिने बाकी आहे त्यामुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या पावसाचा ही मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे त्यामुळे आताची परिस्थिती पाहता गिरणा नदी जवळपास पूर्ण वर्षभर वाहणार असल्याचा अंदाज गिरणा परिसरातील नागरीकांनी व्यक्त केला आहे """":केळी व ऊस लागवळीत वाढ होणार सध्या गिरणा धरण हे शंभर टक्के भरले आहे त्याचा फायदा गिरणा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे गिरणा धरण पूर्णपणे भरल्याने शेतकऱ्यांनी ही समाधान व्यक्त केले आहे गिरणा काठी असलेल्या शेतांना याचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे पाणी प्रश्न सुटल्याने केळी व ऊस लागवळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे त्यामुळे यंदा गिरणा लाभ क्षेत्रात केळी व ऊस उत्पादनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे प्रतिक्रिया गिरणा धरण शंभरटक्के भरल्याने यांचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे आमचे शेत गिरणा काठीच असल्याने त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे केळी व ऊस लागवळीत मोठया प्रमाणावर वाढ होणार आहे आधीच चार एकर क्षेत्रात केळी लागवळ केली आहे गिरणा शंभर टक्के भरल्याने आणखी दोन एकर क्षेत्रात केळी लागवळ करणार आहे धनंजय शिवाजी पाटील शेतकरी सावदे गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने शेती पिकांना भविष्यात फायदा होईल तसेच गिरणा लाभ क्षेत्रानाही गिरणेच्या वाढत्या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे तसेच कजगावसह अनेक गावांचा पाणी प्रश्न ही सुटणार आहे चेतन निवृत्ती पवार शेतकरी कजगाव

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम