कजगाव कनाशी रस्त्यावरील शेतातून शेततळ्यात बसवलेली अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीची ताडपत्री अज्ञात चोरट्यांनी चोरत नेत पोबारा केला

कजगाव ता.भडगाव येथील कजगाव कनाशी रस्त्यावरील शेतातून शेततळ्यात बसवलेली अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीची ताडपत्री अज्ञात चोरट्यांनी चोरत नेत पोबारा केला सदर घटनेमुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे येथील शेतकरी प्रकाश सोनु पवार यांचे कजगाव कनाशी रस्त्यावर रोड ला लागुन शेतजमीन आहे या शेतजमीनीत पाणी चिंचनासाठी शंभर बाय शंभर चे शेततळे बनविण्यात आले असुन यात अंदाजे अडीच लाखाची महागडी ताडपत्री लावण्यात आली होती दि.२० च्या रात्री काहि अज्ञात चोरट्यांनी शेततळ्यातली ताडपत्री कापुन चोरून नेली ताडपत्री मोठी व जाड असल्याने ती वजनदार होती ती चोरून नेण्यासाठी चार ते पाच चोरट्यांच टोळक्याने हि हिम्मत केली असलं अशी चर्चा परिसरातील शेतकऱ्यां मध्ये चर्चिली जात आहे चोरट्यांची धाव सुनाट भागाकडे कजगाव परिसरात चोरटे सुसाट झाले असुन गेल्या आठवड्यात उड्डाणपुला जवळच्या शेतातून नव्वद हजारांची बैलजोडी चोरट्यांनी लांबवली त्या अगोदर त्याच भागातुन शेळ्यांचा गोठाच रिकामा केला होता गेल्या आठवड्यात भोरटेक शिवारातील शेतातील शेडमध्ये ठेवलेले ठिबक सिंचन चे दोन बंडल चोरट्यांनी लांबवले दि.१८ रोजी भोरटेक जवळील विरळ वस्ती मधील नागरिकांना भुरळ टाकत तीन शेळ्या व काहि रोकड भामट्यांनी लांबवली दोन दिवस उलटत नाहि तोच शेततळ्यातील अडीच लाख रुपये किंमतीची ताडपत्रीच चोरट्यांनी चोरत पोबारा केला शेत शिवारात होत असलेल्या चोरीमुळे शेतकऱ्यां मध्ये घबराट पसरली आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम