
कजगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचार
कजगाव ता.भडगाव कजगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामात सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार आढळून येत आहे त्या साठी या कामाची चौकशी होई पर्यंत कामे बंद करावी व भ्रष्टाचाराला आळा घालावा अशी मागणी उपसरपंच सह बारा सदस्यांनी लेखी निवेदन देत केली असुन निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती भडगाव, विस्तार अधिकारी पंचायत समिती भडगाव व ग्रामसेवक ग्रामपंचायत कजगाव यांना पाठविल्या आहेत सदर निवेदनात म्हटले आहे की १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या कामा मध्ये व चालु असलेल्या कामा मध्ये भ्रष्टाचार आढळून आलेला दिसतो त्या साठी तक्रारदार सदस्यांनी दि.१३ जुन रोजी ग्रामसेवक यांना तोंडी तक्रार दिली होती या बाबत ग्रामसेवक यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने या बाबत विस्तार अधिकारी यांना चौकशी बाबत सांगितले असुन सुरू असलेले काम बंद करून त्याची सकोल चौकशी व्हावी व त्यात त्याच्या कामाचे मुख्यबिल,टेस्टिंग रिपोर्ट, इ ट्रेन्डरींग, इस्टिमेट व ठेकेदाराचे हमी पत्र हे आपण चौकशी साठी सादर करावे त्याची एक छायांकित प्रत सदस्यांना देण्यात यावी या चौकशी चा अहवाल पूर्णपणे सादर होत नाहि तो वर काम बंद ठेवावीत आम्ही सदस्य सही द्वारे १५ व्या वित्त आयोग कामांना आमचा विरोध नोंदवत आहोत असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर उपसरपंच खुशाल भंगा भोई,सदस्य हिलाल त्रंबक चौधरी, माजी सरपंच विद्यमान सदस्य मनोज ललीतकुमार धाडीवाल, सदस्या मुमताजबी मो.रफिक तांबोळी,आनंदा पांडुरंग महाजन,ईश्वर जगन्नाथ पाटील,पुंडलिक मधुकर सोनवणे, सुंदरबाई हरचंद चौधरी,मंगलाबाई उत्तम भिल,संगीता उत्तम मोरे,आशा रोहिदास महाजन,रोहिणी हिलालसिंग पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम