खरिपाच्या शेती मशागतींना वेग,यंदा कापसाच्या लागवडित होणार वाढ

खरिपाच्या शेती मशागतींना वेग,यंदा कापसाच्या लागवडित होणार वाढ कजगाव ता भडगाव पावसाळा काही दिवसांवर आल्याने शेतीमशागतीच्या कामांना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे शेतकरी आपल्या शेतात दिवसभर विविध कामे करतांना दिसून येत आहे पावसाळा तोंडावर आल्याने बळीराजा आपल्या पारंपरिक शेतीकामाला सुरुवात करीत आहे मागील वर्षी कजगाव व परिसरात पाऊस समाधानकारक झाला होता त्यामुळे शेतकरी समाधानी होता यंदाही पावसाने कृपादृष्टी ठेवून भरभरून वरुण वर्षाव करावी अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत मे आता शेवटच्या टप्यात असल्याने पावसाची शक्यता बहुतांशी जून मध्येच पहिल्या आठवडयात आगमन होण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमशागतींना वेग दिल्याचे दिसून येत आहे """:यंदा कापसाचा पेरा वाढणार? दरम्यान मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरा वाढण्याची दाट शक्यता आहे मागील वर्षी शेतकऱ्यांनी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती मात्र कापसाचे उत्पन्न विक्रमी घटल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता मात्र यंदा ही कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे दिसून येते याचे कारण म्हणजे मागील वर्षी कापसाचे उत्पादन जरी घटले असले तरी भाव समाधानकारक होता शेतकऱ्यांचे हक्काचे पीक म्हणून पांढऱ्या सोन्याला अर्थात कापसाला विशेष नगदी पीक म्हणून प्राधान्य देत असतो त्यामुळे यंदा कापसाचा पेरा मका उडीद मुंग व अन्य पिकांच्या तुलनेत वाढणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे प्रतिक्रिया शासनाने एक जून पर्यंत बियाणे विक्रीला परवानगी दिलेली नाही साधारण एक जून नंतरच शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहेत पावसाळा काही दिवसांवर आल्याने शेतकरी विविध कामासाठी व्यस्त आहेत यंदा मागील वर्षांच्या तुलनेत कापसाची लागवड वाढण्याची शक्यता आहे त्यामुळें यंदा कापूस बियाण्याची विक्री ही वाढण्याची शक्यता आहे ऋषिकेश अमृतकर कृषिकेंद्र चालक तथा युवा शेतकरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरा वाढणार आहे मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांचा कल इतर नगदी पिकांच्या तुलनेत कापसाला जास्त आहे त्यामुळे यंदा कापसाचे लागवड क्षेत्र वाढणार आहे सोमनाथ पाटील जिल्हास्थरिय आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम