गुरे चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रदार मालेगावातुन अटक

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी )शहरातील व ग्रामीण भागातील बैल व गाय रात्रीच्या वेळी चारचाकी वाहन सोबत आणुन चोरुन नेणाऱ्या टोळीचा मोरक्या रशिद कुरेशी व त्याचा भाऊ शकील हे मागील आठ महीन्यांपासून अमळनेर पोलिसांनी चार गुन्हयात पाहीजे होते. त्यांच्या विरूद्ध कोर्टाने स्टॅण्डींग वॅारंट सुद्धा काढले होते. त्यातील मुख्य सुत्रधार रशीद हा मालेगाव शहरात *पाचव्यांदा* नवीन लग्न करून संसार थाटुन दडुन बसला आहे अशी गुप्त बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांनी सहा.पोलीस उप निरीक्षक विलास पाटील, मिलिंद भामरे, साळुंके यांना मालेगाव शहरात पाठवले तसेच तेथील गुप्त बातमीदारांना सक्रिय करत आरोपी रशिद शफी कुरेशी व शकील शफी कुरेशी अशांना बातमी काढून वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केले आहे. त्यांना अमळनेर पोस्टे गुरनं 495/2021 भादवि कलम 379,34 यामध्ये अटक केले असुन आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम