चोपडा / प्रतिनिधी
येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्यावतीने संस्थेच्या माजी अध्यक्षा तथा चोपडा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्व. डॉ. सुशीलाबेन शाह ‘जीजी’ यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या साक्षी प्रमोद बोरसे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला असून तिला रु. १ हजार रोख, स्मृतिचिन्ह व गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले. तर विवेकानंद विद्यालयाच्या सत्यम संजय सोनवणे व महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या वैष्णवी दीपक माळी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या बक्षिसांचे प्रायोजकत्व ग स बँकेचे संचालक योगेश सनेर यांनी स्वीकारले होते. शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या बक्षीस वितरण प्रसंगी मंचावर संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील,
प्रायोजक ग स संचालक योगेश सनेर, सौ. सनेर यांच्यासह वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन, तांदळवाडी येथील जयश्री दादाजी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील, समाजकार्य महाविद्यालयाच्या संबोधी देशपांडे हे उपस्थित होते.
स्पर्धेचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक संजय बारी यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सुनील पाटील यांनी केले.
ब यावेळी परीक्षक राजेंद्र महाजन, डॉ. संबोधी देशपांडे तसेच योगेश सनेर यांनी मनोगते व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर बंधू- भगिनींचे सहकार्य लाभले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम