चोपड्यात भाजपाचा विजयी जल्लोष

बातमी शेअर करा...

चोपडा / प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यात घवघवीत यश संपादन केले घवघवीत यशाचा आनंद उत्सव चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे देखील करण्यात आला.

चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने सर्व प्रथम मारोतीरायाला पुष्पहार अर्पण करून पेढे चढवुन सुरूवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास माल्यार्पण डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करून फटक्याच्या आतषबाजीने ढोल ताश्याच्या गजरात एक मेकांना पेढे भरऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते तिलकचंद शहा, मुन्ना शर्मा, आत्माराम माळके, चंद्रशेखर पाटील, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, नरेंद्र पाटील, रविंद्र मराठे, प्रकाश पाटील रवि आबा, हिंमतराव पाटील, हनुमंत महाजन, संजय जैन, धिरज सुराणा, गोपाल पाटील, विशाल भावसार, संदिप चव्हाण, दिनेश जाधव, दिपक बाविस्कर, विजय बाविस्कर, संभाजी पाटील, धर्मदास पाटील,

भरत सोनगिरे,परेश धनगर, जिवन पाटील, जितेंद्र चौधरी, गौरव सोनार, सागर नेवे, विवेक गुजर, सुनिल सोनगिरे, हेमंत जोहरी, राजु शर्मा, मोहीत भावे, भुषण महाजन कमल ताई पाटील, मीराबाई माळी, पदमाबाई माळी, सिंदुबाई माळी, जोतीबाई माळी, हिराबाई माळी, अन्नपुर्णाबाई माळी, सुरेखाबाई माळी, निर्णमलाबाई माळी, निर्मलाबाई सोनवणे या सह असंख्य भाजप पदअधिकारी कार्यक्रते बंधु उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम