भडगाव तालुका समन्वयक व पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

तहसिलदार कार्यालयात तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची नुकतीच समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीत सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
————-
नुकतीच भडगाव तालुका समन्वयक व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षासह सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहीली बैठक तहसीलदारांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार मुकेश हीवाळे यांनी नवनियुक्त अध्यक्षांसह समितीच्या सदस्याचा सत्कार केला. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपआपल्या विभागाचा आढावा सादर केला. यावेळी अध्यक्ष युवराज पाटील यांनी विभागनिहाय आढावा घेत संबंधित अधिकार्याना सुचना केल्या. बैठकीला समितीचे सदस्य विश्वास पाटील, स्वदेश पाटील, नागेश वाघ, रावसाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, पदमिनी तहसिलदार, सुनंदा राजपुत, डाॅ.विशाल पाटील आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम