जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कॉन्ट्रॅक्ट भरतीत लेबर कंपनीचा भोंगळ कारभार

लेबर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण सेवेचे तीन - तेरा ; आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे रुग्ण सेवा विस्कळित

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि २६ डिसेंबर २०२३

जळगांव जिल्ह्यातील आरोग्य विभागात रुग्णांना चांगली व सुरळीत सेवा देण्यासाठी राज्य शासनातर्फे श्री स्वामी सर्व्हिसेस पुणे या कंपनीची निवड केली असून सदर कंपनीने जिल्हाभरातील आरोग्यवर्धीनी केंद्रासाठी उपस्थित / रक्षक व सफाई कर्मचारी ( Attendent / Guard & Cleaning Staff ) पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कॉन्ट्रॅक्ट भरतीत लेबर कंपनीचा भोंगळ कारभार

मात्र सदर कंपनीने अमळनेर तालुक्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचारी नेमतांना प्रथम १२ व नंतर १२ अशा दोन याद्या जिल्हा परिषदेस दिल्याने प्रथम यादीतील निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना आज पावेतो हजर केलेले नाही.

सदर कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.

त्यामुळे सदर कंपनीस ब्लॅक लिस्टेड करण्याची मागणी होत आहे. हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे.

१५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद जळगांव यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील शहरी आरोग्य वर्धीनी केंद्रांसाठी बाह्यस्त्रोत एजंसी ची निवड करून उपस्थित / रक्षक व सफाई कर्मचारी (Attendent / Guard & Cleaning Staff ) या दोन पदांची भरती करणे चे आदेश दिलेले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धीनी केंद्रातील निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी श्री स्वामी सर्व्हिसेस या एजंसी ने १४ डिसेंबर २०२३ रोजी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर केली, मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि सदर या यादीतील अमळनेर शहरातील आरोग्यवर्धीनी केंद्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांना हजर न करता दुसरी यादी जिल्हा परिषदेस देण्यात आली आहे.

दरम्यान निवड झालेल्या यादीतील ६ जणांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार केली आहे. त्यावेळी डॉ. भायेकर यांनी अमळनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोसावी यांना सूचना केल्या असून सदर कंपनीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या प्रकारात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पंकज शिंपी यांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे तक्रारदार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

तसेच सदर कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार असून सदर कंपनीस ब्लॅक लिस्टेड करावे अशी मागणी तक्रारदारांनी प्रत्रकारांकडे केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम