ज्यांनी आई वडिलांना वागले नाही त्यांना चांडाळ म्हणतात – ह.भ.प.महंत अनंतदासजी (कजवाडेकर)

ज्यांनी आई वडिलांना वागले नाही त्यांना चांडाळ म्हणतात - ह.भ.प.महंत अनंतदासजी (कजवाडेकर)

बातमी शेअर करा...

चोपडा / प्रतिनिधी

देव- धर्माच्या नावाखाली मोठा देखावा करतात. नको त्या दिंड्या, भंडारा, अश्या विविध कार्यक्रमाचे नियोजन करत असतात. तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी असे म्हटले जाते मात्र आपल्या सख्या आई वडिलांना जे वागत नाही त्यांना शास्त्रात चांडाळ म्हटले गेले आहे.असे परखड मत
ह.भ.प.महंत अनंतदासजी (कजवाडेकर) यांनी वेळोदे येथील राम मंदिर चौकात व्यक्त केले.

येथील रहिवासी नेमीचंद जैन यांच्या आईच्या स्व.सुंदरबाई रामचंद्र जैन याच्या स्मृति प्रित्यर्थ ते भजनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता त्यात ते बोलत होते.

गृहस्थ आश्रमात पैसा लागतोच पंरतु नीतीचा आणि अनितीचा यात फरक आहे उत्तम व्यवहार करा. पैसा जाऊ दया पंरतु आपली नैतिकता जाऊ देऊ नका पैश्याने अधोगतीला आलो तरी चालेल मात्र नैतिकता जागृत ठेवली तर लक्ष्मीला सुद्धा परत यावेच लागते.

देव,धर्म, जे शिकवतात ते संत त्याची सेवा करून संत सेवेतून मुक्त व्हा… तसेच गीता व भागवत वाचून वाचन शास्त्रऋणातून मुक्त व्हा असे अनेक उदाहरण देत आई वडिलांचे महत्त्व पटवून दिले आज जो कीर्तनाचा लाभ ज्यांनी घेतला ते नेमीचंद जैन हे सुद्धा तीस पूर्वी या गावाचे सरपंच होते.

त्यांच्या व्यापार देखिल वीस ते बावीस खेड्यावर चालायचा मात्र नियतीने असे चक्र फिरविले की ते रोडवर येऊन गेले होते परंतू आपल्या बिकट परिस्थितीत देखील आपली नैतिकता जपून ठेवली तर लक्ष्मी परत आली आणि आज त्यांची परिस्थिती पूर्व पदावर आली.

असे उदाहरण पाहायला कुठेही जाण्याची गरज नाही तर ते आपल्या समोर आहे. असे परखड मत त्यांनी आपल्या कीर्तनातून मांडले
यावेळी पंचक्रोशीतील भक्त मंडळी हजर होती तद्नंतर जैन परिवारातर्फे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम