तापी अर्बन पतसंस्थेचा ताबा सोडण्यावरून ठेवीदार आक्रमक

बातमी शेअर करा...

तापी अर्बन पतसंस्थेचा ताबा सोडण्यावरून ठेवीदार आक्रमक

संस्था सदर इमारतीतच राहावी ठेवीदारांची मागणी

सावदा । प्रतिनिधी

सावदा येथील एकेकाळी नावाजलेली पतसंस्था असलेल्या तापी अर्बन पतसंस्था ज्या इमारतीत आहे ती इमारत खाली करून सदर दप्तर रावेर येथे हलविण्या साठी

अवसायक राहुल पी मुजुमदार हे दि. 30 डिसेंबर रोजी सावदा येथे आले असता त्यास संस्थेचे ठेवीदार यांनी तीव्र विरोध दर्शविला.
अवसायक मुजुमदार हे सदर तापी अर्बन पतसंस्थेची इमारतीचे कुलूप उघडून संस्था खाली करण्याचा प्रयत्न करीत असतांना

तेथे सदर ठेवीदार येऊन धडकले व त्यानी संस्थेचे कुलूप उघडू दिले नाही. आमचे पैसे ज्या इमारतीत जमा केले तेथूनच पैसे घेऊ असा पवित्रा घेतला

तसेच शहरातील अनेक संस्था बंद झाल्या नंतर त्या संस्थाचे कार्यालय येथून हलविल्या नंतर त्या संस्थेच्या ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे मागण्यांसाठी जागाच शिल्लक राहिली नाही.

तर सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा निबंधक या कार्यालयात देखील दाद मिळत नाही म्हणून आता ही संस्था मात्र येथून हलवु देणार नाही.

तसेच येथून तापी अर्बन पतसंस्थेचे दप्तर हलविल्यास अनेक कागदपत्रे इतर संस्था प्रमाणे गहाळ होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली.

यावेळी येथे संस्थेचे असंख्य ठेवीदार मोठ्या संख्यने उपस्थित होते.

संस्थेच्या ठेवीदार यांच्या आक्रमते मुळे व मागणी मुळे अखेर अवसायक राहुल मुजुमदार यांनी संस्था खाली न करता काढता पाय घेतला.

त्यामुळे ठेवीदार यांनी आनंद व्यक्त केला. या संस्था खाली करण्यामागे जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा दबाव देखील जिल्हा निबंधक यांचेवर असल्याचा आरोप देखील ठेवीदार यांनी यावेळी केला.

दरम्यान रावेर तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रावेर यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

हे ही वाचा 👇

अंबरनाथ: घरपट्टी खात्यातील समस्यांमुळे नागरिक त्रस्त, माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांची तक्रार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम