नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते रुबी स्टार हॉस्पिटलला कॅथ लॅब सेवेचा शुभारंभ

बातमी शेअर करा...

गजानन तायडे / जामनेर

जामनेर शहरातील कोरोना काळात सर्वांच्या सेवेत तसेच प्रसिद्ध रुबी हॉस्पिटलमध्ये आता हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून त्यांचा जीव वाचवावा या माध्यमातून शहरातील रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये अद्यावत कथलॅब सेवेचा शुभारंभ जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधना महाजन व डॉ. अजय चौरसिया कारझोलॉजिस्ट बॉम्बे हॉस्पिटल मुंबई यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष महेंद्रभाऊ बाविस्कर, नवल पाटील, डॉ. भंगाळे, जळगाव रुबी स्टार हॉस्पिटल डॉ. गिरीश अय्यर, डॉ. विश्वनाथ चव्हाण, भाजपा ज्येष्ठ नेते शंकर आप्पा मराठे यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक व रुबी स्टार हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित होते कथ लॅब सुविधांमध्ये रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ तिच्यावर उपचार होणार.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम