पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

बातमी शेअर करा...

दैं बातमीदार | 12 डिसेंबर 2023

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांच्यावर वाढदिवशी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिवस निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कर्तृत्व आणि दातृत्वाचा अनोखा संगम म्हणजे पंकज बोरोले होय. संस्थेतील कर्मचारी राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. निधनापूर्वी त्यांनी स्वतःचे घर असावे अशी इच्छा व्यक्त केली होती.

पण स्वतःचे घर असावे ही त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा आज आपल्या वाढदिवशी पंकज बोरोले यांनी राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांच्या पत्नी रुपाली अत्तरदे यांना १५ लाख रुपये किमतीच्या फ्लॅटची चावी देत फ्लॅट बक्षीस स्वरूपात देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली.

तसेच रुपाली अत्तरदे यांना पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात अनुकंपा तत्वावर सेवेत रुजू करून घेतले. सदर प्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले. राजेंद्र अत्तरदे यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. सुरेश बोरोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वतः पंकज बोरोले व दिपाली बोरोले यांनी रक्तदान केले. ९६ रक्तदात्यांनी नोंदणीकरण केले. सदर कार्यक्रम आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर आर आत्तरदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय के. पाटील, डाॅ.नंदिनी वाघ, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. अजय पाटील, प्रा.दिपक देवरे तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्त केंद्राचे सुनील माळी, किरण लोहार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

सकाळी ६ वाजता मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मॅरेथॉन स्पर्धेत ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

विशेष म्हणजे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. बोरोले यांनी देखील सहभाग नोंदवला. दि. ६ ते ११ डिसेंबर दरम्यान पंकज चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

त्यात १६ संघ सहभागी झाले होते. दि. ११ डिसेंबर रोजी प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यासाठी एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

दि.१३ डिसेंबर रोजी सायं.६ वाजता प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम