करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी याच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेधार्थ निवेदन
भडगाव वार्ताहर —
श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी याच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेधार्थ भडगाव तालुका करणी सेना व महाराणा प्रतापसिंहजी जयंती उत्सव समिती भडगाव तालुका यांच्या वतिने भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व भडगाव पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. हे निवेदन दि. ११ रोजी सकाळी देण्यात आले.
यावेळी आनंद सिंग राजपूत, विजय पाटील,शरद राजपुत, ज्ञानेश्वर ठाकरे, नरेंद्र राजपुत, जयंतीलाल परदेशी, प्रकाश राजपुत,ओमप्रसाद राजपुत, राजेंद्र परदेशी ,नवल राजपुत,भास्कर राजपुत,मोतीलाल पाटील, बन्सीलालजी परदेशी,झुंबर राजपुत, शरद आण्णा राजपुत, सुनिल पाटील, मुन्ना परदेशी व सर्व राजपुत समाज बहु संख्येने उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम