
परंपरा नाही तर बुध्दीप्रामाण्यवादाने कळेल ते सत्त्य मानावे -स्वप्नाताई लांडे
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळावा उत्साहात
अकोला I प्रतिनिधी
डोकं सशक्त करून विचार करण्याचं शास्त्र म्हणजे बुध्दीप्रामाण्यवाद.परंपरा सांगतात ते सत्त्य मानु नका. प्रत्येक गोष्ट कसोटीवर तपासून वैज्ञानिक प्रक्रीया रूजवावी.देव आणि धर्म हे अंश्रध्देचं मुळ नाही तर ती चालणाऱ्या बदमाशांमध्ये दडलेली आहे, म्हणून प्रामाण्यवाद जागवावा.परंपरेप्रमाणे सावित्री आई वागल्या असत्या तर समाजातील स्त्रिया शिक्षण घेऊच शकल्या नसत्या.असे रोख ठोक वास्तवतावादी प्रतिपादन अंधश्रध्देविरूध्द जनजागृती करणाऱ्या समाजसेविका,स्तंभलेखिका डॉ.स्वप्नाताई लांडे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ४१ व्या विचारमंथन मेळाव्यात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
युवा समाजसेविका सौ.पुजा काळे,खदान पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मनोज केदारे हे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, पदाधिकारी,कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी स्वप्नाताई लांडे,यांना “लोकस्वातंत्र्य प्रबोधन रत्न गौरव पुजाताई काळे” पुजाताई काळे यांना ” “समाजरत्न गौरव” पत्रकार मोहन शेळके व सत्त्य लढाचे सतिश देशमुख यांना “लोकस्वातंत्र्य पत्रकार गौरव” या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ठाणेदार केदारे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना वंदन – अभिवादन करण्यात आले.शहिद जवान, अत्त्याचारातील महिला बळी,आपत्ती व अपघात बळी,दिवंगत पत्रकार,व आत्मग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.पत्रकार संजय भास्करराव देशमुख यांना कार्ड व नियुक्तीपत्र,त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आय कार्ड व ईतरांना सुध्दा वितरीत करण्यात आली. याप्रसंगी संजय देशमुख यांचे प्रासृतविक व पुजाताई काळे यांनी आपल्या मनोगतातून सर्व पत्रकारांसोबतच विधायक लोकांना एकत्र बांधून माणुसकी जपण्याचा लोकस्वातंत्र्यचा उपक्रम स्तूत्त्य असल्याचे म्हटले.तर मनोज केदारे यांनी वाढत्या गुन्ह्यांवर कायद्यांचा अंकुश,त्याचे महत्व व प्रभावी अंमलबजावणीत समाजाच्या सहभागाची आवश्यकता स्पष्ट केली.
साहित्यिक प्रा.मोहन काळे यांचे संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रदिप खाडे,राजेन्द्र देशमुख,अंबादास तल्हार,निशाली पंचगाम,सोनल अग्रवाल,सुषमा मोरे,प्रा.डॉ.संतोष हुशे,डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे,संजय कृ.देशमुख,सुरेश पाचकवडे,मनोहर मोहोड,सागर लोडम,दिलीप नवले,विजय देशमुख, शामराव देशमुख,प्रा.विजय काटेडॉ, .राजेश कराळे,अभि.सुरेश तिडके,सतिश देशमुख( विश्वप्रभात), अशोककुमार पंड्या,विजयराव बाहकर, संजय देशमुख,सतिश वानखडे,प्रा.भारत वरठे ( अमरावती) अनंतराव देशमुख,दिपक सिरसाट,गजानन मुऱ्हे,अनंतराव देशमुख,गौरव देशमुख,भानुदास कराळे,के.एम.देशमुख,डॉ. संकेत देशमुख,शिवचरण डोंगरे,धारेराव देशमुख,वसंतराव देशमुख,दिपक शर्मा,व्ही.एस.देशमुख,सोनु देशमुख,प्रशांत देशमुख,शिवचरण डोंगरे,पि.एन जामोदे,राजाभाऊ देशमुख व अनेक पत्रकार,सभासद उपस्थित होते.आभारप्रदर्शन सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम