
पावसाचे दमदार आगमन झाल्याने बळीराजा समाधानी
कजगाव ता.भडगाव कजगाव परिसरात पावसाने चांगलीच पाठ फिरवली होती या मुळे बळीराजा चिंतातुर झाला होता मात्र दि.२७ रोजी पावसाचे दमदार आगमन झाल्याने बळीराजा समाधानी झाला नी वाचलो रे बा दुबार पेरणीच्या संकटातून ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप बाकी आहेत ते सारेच उद्या पेरणीच्या तयारीत रहातील पहिल्या वहिल्या पडलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे पावसाळा सुरू झाल्या पासुन केवळ तीन वेळा तुरळक पाऊस बरसला आहे अनेकांनी पाऊस बरसेल या आशेवर पेरण्या केल्या आहेत मात्र पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती पावसाळा सुरू होऊन जवळपास वीस दिवस होत आले आहे रोहिण्या चा पाऊस बरसला नाहि पहिल्या नक्षत्रात काहि ठीकाणी तुरळक पाऊस झाला नक्षत्र कोरडेच गेले आद्रा नक्षत्राचे आगमन झाले मात्र अजुनही जोरदार पाऊस होत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त होता दि.२७ रोजी सायंकाळी साधारण एक ते दिड तास दमदार पावसाने हजेरी लावली पाऊस जोरदार होत नसल्याने अनेकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या तर काहींनी तुरळक पडलेल्या पावसामुळे पेरण्या केल्या होत्या जुन महिना शेवटच्या टप्यात येऊन संपण्यात आला असतांनाच आज दमदार पावसाचे आगमन झाले त्यामुळे बळीराजा चिंतामुक्त झाला आहे दि.२४ रोजी पडलेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या कारण जरी कजगावात पाऊस रिमझिम पडला मात्र इतरत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने दि.२५ रोजी अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या उन्हाने शेतकऱ्यांची झोप उडाली होती कारण पुर्ण ओल नसतांना पाऊस येता झाला या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र दोन दिवसांपासून पडत असलेल्या उन्हामुळे शेतकऱ्यांची झोप मात्र उडाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या आज झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे """'अनेक व्यापारी संकुलात घुसले पाणी चोरदार झोडपल्या पावसाने अक्षरक्ष गावातील अनेक व्यापारी संकुलात पाणी थेट अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे बसस्थानक भागातील काकाजी कॉम्प्लेक्स व नागद रोडवरील न्याती व्यापारी संकुलात दमदार पावसाचे पाणी आत घुसल्याने काहि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले संकुलात घुसलेले पाणी उपसण्यासाठी व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम