पॆशांच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला करीत केले जखमी

जळगाव शहरातील घटना

बातमी शेअर करा...

पॆशांच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला करीत केले जखमी

जळगाव शहरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – पैशांच्या वादातून तरुणावर रकाने चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना आज १८ रोजी दुपारी शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात घडली. मात्र घटने नंतर हल्ला करणारा तरुण स्वताहून पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसांत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होये.

मोहित सुनील चौधरी (वय २४, रा.भादली ता. जळगाव) असेचाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भादली येथे परिवारासोबत राहायला असून मोहितचा संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील (वय २३, रा. हनुमान नगर, जळगाव) याच्याशी ओळख असल्ण्याने देवाणघेवाण होत असायची. याच कारणावरून आज बुधवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अयोध्या नगरातील हनुमान मंदिराजवळ मोहित चौधरी हा आला असता धीरज पाटील याच्याशी त्याचा वाद झाला.

त्याच्यातून धीरज पाटील याने मोहितवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून मोहित चौधरी याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम