पोलीस भरती कधी करणार? अजीत दादा यांचा सरकारला प्रश्न

बातमी शेअर करा...

 

 

मुंबई दि.२४ ऑगस्ट | महाराष्ट्रातील विकसित झालेल्या शहरांमध्ये पोलिस विभाग असायला हवा तेवढा मोठा नसून शहरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे पोलिस भरती कधी करणार, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.

 

नवी मुंबई संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडली असता अजितदादांनी त्यात सरकारला उपप्रश्न केला. नवी मुंबई येथे अटक केलेले गुन्हेगार महिनाभरात जामिनावर सुटून पुन्हा आपली दहशत परसविण्यासाठी गुन्हे करत आहेत. या भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. ते झाल्यावर नवी मुंबई येथील परिस्थिती वेगळीच असेल. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर मोक्का लावण्याचा निर्णय गृहविभाग घेईल का? असे अजितदादांनी विचारले.

.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम