मन्यावस्ती येथे भारतीय पत्रकार महासंघा तर्फे पत्रकार दिना निमित्त खा. रक्षाताई खडसे यांच्याहस्ते आदिवासी बांधवाना ब्लॅकेट वाटप

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ७ जानेवारी २०२४

          मन्यावस्ती येथे भारतीय पत्रकार महासंघा तर्फे पत्रकार दिना निमित्त खा. रक्षाताई खडसे यांच्याहस्ते आदिवासी बांधवाना ब्लॅकेट वाटप

चोपडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मन्यावस्ती या पाङ्यावर भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने आरोग्य शिबीरात 55 आदिवासी बांधवाची आरोग्य तपासणी करून व थंडीचे ब्लॅकेट वाटप करून “पत्रकार दिन” साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर लोकसभा मतदार संघाचे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाट्न व थंडीचे ब्लॅकेट वाटप करण्यात आले.

जनसमान्याचा आधार स्तंभ म्हणजे भारतीय पत्रकार महासंघ सालाबादा प्रमाणे यावर्षी देखील आदिवासी भागात भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकार दीनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

त्या वेळी खासदार रक्षा खडसे यांनी सर्व आदिवासी बंधूना मिळणाऱ्या शासनाच्या योजना बाबत चौकशी करून मोफत रेशन, उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देऊन संबंधित अधिकारी यांना आदेशानुसार त्वरित शासकीय योजनेचा लाभ परिसरातील सर्व आदिवासी बंधूना मिळावा अशा सूचना करण्यात आल्या.

यावेळी प्रकाश सरदार यांनी आदिवासी बंधूना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. आदिवासी बांधवाचे त्यांचे हक्क घटनेत काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले. सदरचा कार्यक्रमाचे नियोजन भारतीय पत्रकार महासंघ चोपडा तालुक्याच्या वतीने करण्यात आला होता.

या कार्यक्रमांस प्रमुख मान्यवर मन्या वस्तीचे प्रमुख मन्या झिंगा बारेला, भारतीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष नवलसिंग राजपूत, उपाध्यक्ष राकेश कोल्हे, सल्लागार प्रकाश सरदार, दैनिक बातमीदारचे संपादक हेमंत पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी प.स.सभापती आत्माराम म्हाळके,

अनु.जमाती जिल्हा अध्यक्ष मगन बाविस्कर, गजेंद्र जयसवाल, गोविंदराव सैदाणे, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, कृउबा समिती संचालक डॉ विकी सनेर, जि प माजी सभापती दिलीप पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विलास पाटील, चोपडा तालुका अध्यक्ष तुषार सूर्यवंशी, तालुका सचिव तौसिफ़ खाटीक,

सह स्थानिक पत्रकार पी.आर. माळी, मनोज मोरे, जितेंद्रकुमार शिंपी, मनोहर देशमुख, भगवान न्हायदे, रावसाहेब पाटील, राजेंद्र चोधरी, प्रशांत सोनवणे, राजेंद्र बोदडे, आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, गट प्रमुख एलीजा मोरे,

आशा वर्कर राहाबाई बारेला, आरोग्य सेविका भिकूताई बोदडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार पी. आर. माळी सर यांनी मानले.

हे वाचा👇

यशोधन ट्रस्ट तर्फे रक्तदान, अवयव दान, देहदान, सर्वश्रेष्ठ दान – एक चळवळ, एक वाटचाल माणुसकीकडे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम