महसूलदिनी कजगावचे गोपीचंद महाजन.नितीन मोरे यांचा सन्मान

बातमी शेअर करा...

महसूलदिनी कजगावचे गोपीचंद महाजन.नितीन मोरे यांचा सन्मान
कजगाव ता. भडगाव येथील गोपीचंद महाजन व नितीन मोरे यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल महसूल दिनी विविध मान्यवरांचा हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पाचोरा तहसीलमधील शिपाई गोपीचंद जगन्नाथ महाजन यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तर कजगाव तलाठी कार्यालयातील कोतवाल नितीन सोमनाथ मोरे यांची महसूल प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बद्दल उपविभागीय उत्कृष्ट कोतवाल म्हणून प्रशस्तीपत्र देऊन पाचोरा प्रांताधिकारी विक्रम बांदल भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे याबद्दल दोघांचे विविध स्थरावरून अभिनंदन होत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम