भोरटेक शिवारात अद्यापही वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच

बातमी शेअर करा...

कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या भोरटेक शिवारात अद्यापही वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच असुन पिकांचे नुकसानीचे सत्र थांबता थांबत नसल्याने शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे. सन २०२१ व २०२२ मध्ये झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई मिळता मिळत नाहि पुन्हा वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे कपाशी पिकांची मोठी नासधूस होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
कजगाव सह परिसरातील अनेक खेड्यावरील बरड भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीन आहेत काहि जमिनी या वन विभागाच्या हद्दीला लागुन असल्याने त्याच प्रमाणे मोकळं रान टेकड्या यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार या भागात असतो मात्र यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे फेब्रुवारी महिन्यात देखील या भागातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते या बाबतीत भोरटेक येथील नुकसानग्रस्त शेतकरी अशोकराव देशमुख व अरुणाबाई देशमुख सह अनेक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती. याचा रीतसर पंचनामा देखील करण्यात आला होता त्याच प्रमाणे जानेवारी २०२१ मध्ये देखील पिकांचे नुकसान झाले होते. त्याची तक्रार देखील देण्यात आली मात्र या तक्रारीची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही ना नुकसान भरपाई देण्यात आली पुन्हा या भागातील अशोकराव देशमुख यांच्या शेतातील उभ्या कपाशी पिकांचे वन्यप्राण्यांनी नासधूस केल्याने या शेतकऱ्यांचे लागोपाठ तिसऱ्या वेळेस मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया
भोरटेक शिवारातील बरड भागातील शेतात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढल्याने गेल्या दोन वर्षांपासून मोठे नुकसान होत आहे वेळोवेळी तक्रार देऊन पंचनामा केला आहे मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळत नाहि तर दुसरीकडे वन्यप्राण्यांचा उपद्रव थांबत नसल्याने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे मागे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.
अशोकराव देशमुख
शेतकरी भोरटेक

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम