महादेव,ऋषीबाबा, कालिका माता नंतर चोरट्यांचे मिशन शनिमंदिर

महादेव,ऋषीबाबा, कालिका माता नंतर आता चोरट्यांचे मिशन शनिमंदिर पूर्ण कजगाव ता भडगाव येथील मंदिरांना भामट्यांनी टार्गेट करण्याच्या प्रकाराने कहरच केला आहे आता थेट भर लोकवस्तीत असलेल्या शनी महाराज मंदिराला टार्गेट केल्याने पुन्हा एकदा भामट्यांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून कजगाव व परिसरात चोरटे मोठे सुसाट झाल्याचे दिसून येते काही दिवसांपूर्वी गावातील महादेव मंदिर ऋषिबाबा मंदिर कालिका माता मंदिर अश्या तिघा मंदिरांना टार्गेट केल्यानंतर आता थेट ग्रामपंचायत कार्यलयाला लागून असलेल्या शनी महाराज मंदिरातील दान पेटी फोटुन त्यातील काही रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे आता पर्यंतच्या मंदिरात चोरी होणारे शनी महाराज मंदिर हे चौथे मंदिर ठरले आहे वारंवार होणाऱ्या मंदिरातील चोऱ्यांमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे ह्या वाढत्या चोरीच्या घटनेमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच शनी महाराज मंदिरात यापूर्वीही चार ते पाच वेळेस दानपेटी फोडल्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे चोरट्यांना आता चांगलाच धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचा सुर ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे त्यामुळे पोलिसांनी मंदिरात होणाऱ्या चोऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन भामट्यांना जेरबंद करावे अशी मागणी जोरदार होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम