रोटरी क्लब अमळनेर च्या सहकार्याने प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात वृक्षारोपण संपन्न

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचालित प्रताप तत्त्वज्ञान केंद्र १०६ वा वर्धापन दिनाचे औचीत्त्य साधून १ जुलै २०२२ रोजी रोटरी क्लब अमळनेर यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. रोटरी क्लब अमळनेर च्या सहकार्याने विविध रोपे आणण्यात आली व उद्यानातील फुल व फळ झाडांना खतही देण्यात आले. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य मा. दिलीपदादा पाटील, मा.प्र-कुलगुरु प्रा.डॉ.एस.टी.इंगळे, अधिसभा सदस्य श्री.दिनेश नाईक, केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ.दिलीप भावसार, केंद्राचे सल्लागार समिती सदस्य प्रा.धर्मसिंह पाटील, प्रा.डॉ.विजय कंची, प्रा.डॉ. धीरज वैष्णव, प्रा.डॉ. राधिका पाठक, खा.शि.मंडळाचे माजी कार्याध्यक्ष गोविंददादा मुंदडे, सेवानिवृत्त प्रा.ए. एम. जैन यांच्या हस्ते केंद्राच्या उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष कीर्तीकुमार कोठारी, सचिव ताहा बुकवाला, माजी अध्यक्ष ऋषभ पारख, माजी सचिव प्रतिक जैन, अभिजित भांडारकर, योगेश येवले, रोहित सिंघवी, शिबी वशिष्ठ, सुबोध पाटील, सनी कोठारी, दिनेश रेजा, महेश पाटील, सौरभ जैन, जे. के. चौधरी यांच्याही हस्तेही केंद्राच्या उद्यानात वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रताप तत्त्वज्ञान केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम