महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना – चाळीसगांव तालुक्यातील शिदवाडी येथील घटना

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ४ जानेवारी २०२४

      महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना – चाळीसगांव तालुक्यातील शिदवाडी येथील घटना

     समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभुषण बागुल व सहकाऱ्यांची घटनास्थळी धाव ; नागरिकांना शांततेचे आवाहन

दिनांक ३ जानेवारी रोजी रात्री शिदवडी गावात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांना सकाळी आढळून आला.

त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी येथील मेहूणबारे पोलीस स्टेशन मध्ये येवून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धडक दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी मेहूणबारे पोलीस स्टेशन येथे जावून समाज बांधवांची भेट घेतली.

तसेच पो. स्टे.चे सहा.पोलीस निरीक्षक यांचेशी चर्चा केली. तसेच समाज बांधवांनी शांतता राखावी असे आवाहन केले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील संशयितांची नावे देण्यात आली असून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत चाळीसगांव चे अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे साहेब यांचेशी देखील संपर्क साधण्यात आला आणि घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना गावात जाण्याचे आदेश दिले.

यानंतर राज्यअध्यक्ष धर्मभूषण बागुल व पदाधिकारी शिदवाडी गावात गेले. घटनास्थळी पाहणी केली. स्थानिक आंबेडकरी समुदायातील नागरिकांची भेट घेतली, चर्चा केली.

तसेच सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यापुढे असा प्रकार होवू नये यासाठी समता सैनिक दल या गावात लक्ष देईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.

गावातील सर्व स्थानिक लोकांनी शांतता पाळण्याचे आवाहनास प्रतिसाद दिला असून गावात शांतता आहे. यापुढे अशा घटनांनी विचलित न होता, कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गाने, शांतता राखून न्याय मिळवावा असे ही आवाहन धर्मभूषण बागुल यांनी केले.

या प्रसंगी समता सैनिक दलाचे तालुका प्रचारक आयु. महेंद्रभाऊ जाधव, शहर प्रचारक आयु.दीपक बागुल हे उपस्थित होते.

तसेच कुंझर येतील महिला नेत्या इंदूताई निकम, आबा वाघ, राहुल वाघ, शिदवाडी येथील ग्रा.पं. सदस्य महेंद्र सुर्यवंशी, चंद्रमनी सूर्यवंशी, पंडित सुर्यवंशी यांचे सह शिदवाडी, मेहूनबारे येथील तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आता या गावात शांतता असून कोणीही अफवा किंवा गैरसमज पसरवु नये असे ही आवाहन धर्मभूषण बागुल यांनी केले आहे.”

हे ही वाचा

चाळीसगावात चारशे लोकांच्या उपस्थितीत रुद्र पूजा संपन्न

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम