रावेरला विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी

बातमी शेअर करा...

किलबिल अकॅडमी


येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आज कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत भगवा ध्वजास गुरु मानून पूजन करण्यात आले सोबतच पर्यावरणातील वृक्ष हे देखील आपले गुरूच आहे असा संदेश देत प्राचार्य नयना निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुरुदक्षिणा म्हणून एक वृक्ष भेट देऊन त्यास वाढवण्याची जबाबदारी सोपवली. बालकाचे प्रथम गुरु म्हणजेच त्यांची माता पिता म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये आदर भावना ,प्रेमभावना निर्माण करून एक सुसंस्कार पिढी घडवावी याकडे किलबिल अकॅडमीचे नेहमीच मार्गक्रमण चालू असते त्यातूनच आज गुरुपौर्णिमेनिमित्त माता पिता पूजन करण्यात आले. चिमुकल्यांनी आपल्या आई-वडिलांना वंदन केले तसेच त्यांची पूजन देखील केले. अतिशय सुंदर असा हा उपक्रम व कार्यक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेला होता संपूर्ण शहरांमध्ये या कार्यक्रमाची प्रशंसा करण्यात येत आहे कार्यक्रमाला शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक असे सर्वांचे सहकार्य लाभले.

————-

माऊली फाऊंडेशन

माऊली फाऊंडेशन संचलित अदित्य इंग्लिश मेडीयम स्कुल व श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय रावेर येथे गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी महर्षि व्यास मुनींच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती दमयंती पाटिल मॅडम या होत्या. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमा या विषयावर भाषण केले. तसेच अदित्य इंग्लिंश मेडीयम स्कुल चे मुख्याध्यापक श्री. संजय पाटील सरांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. कल्पना पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार  जयश्री साळुंके मॅडम यांनी मानले.कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम