लोण येथील तरुणाचा चाळीसगाव नजीक अपघातात मृत्यू

लोण येथील तरुणाचा चाळीसगाव नजीक अपघातात मृत्यू कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या लोण पिराचे येथील युवकाचा चाळीसगाव नजीक ओझर गावाजवळ अपघातात मृत्यू झाला तरुणाच्या मृत्यूमुळे लोन गावात हळहळ व्यक्त होत आहे लोण येथील अशोक तुकाराम पाटील(वय३८) हे चाळीसगाव येथे कामानिमित्त गेले होते चाळीसगावहुन बाजार करून घराकडे येत असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशोक पाटील हे लोण गावात ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक म्हणून काम करीत होते त्यामुळे त्यांचा सर्व गावाशी संपर्क होता हसतमुख व्यक्ती अचानक गेल्याने संपूर्ण गावात चूल पेटलीच नाही एक मेहनती तरुण अचानक अपघातात गमावल्याने नातेवाईक व ग्रामस्थ हंबरडा फोडून रडत होते मयताच्या पश्चात पत्नी दोन मुले आई भाऊ भावजयी असा मोठा परीवार आहे """:चुलत बहिणीच्या लग्नाच्या आनंदावर विरजण मयत अशोक पाटील यांच्या चुलत बहिणीचे लग्न एक दिवसांवर आलेले असतांना दिनांक २४ रोजी सकाळी सात वाजता हा अपघात झाला मयत तरुण हा आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या तयारीसाठी चाळीसगाव येथे बाजारात खरेदी साठी गेला होता अनेक दिवसांपासून अशोक हा लग्नाच्या जय्यत तयारीत व्यस्त होता मात्र दुर्दैवाने अशोकचा अपघाती मृत्यू झाल्याने दिनांक २५ रोजी झालेल्या विवाहाच्या लगबगीत अशोकच्या मृत्यूचाच शोक अधिक दिसून आला

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम