६ जानेवारी पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन

आमदार डॉ बालाजी किणीकर व माजी नगराध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ४ जानेवारी २०२४

६ जानेवारी पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन

आमदार डॉ बालाजी किणीकर व माजी नगराध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती

केंद्रशासनाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे तथा लाभार्थ्यांशी सुसंवाद साधणे.

मराठी साहित्य परिषद संमेलनच्या स्वागताध्यक्ष पदी सुनील भाऊ चौधरी

या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रा दिनांक ३ जानेवारी ते ६ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

त्याच अनुषंगाने बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच आमदार डॉ बालाजी किणीकर व माजी नगराध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा चौक अंबरनाथ व बी केबिन रोड येथे “विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रसंगी अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्या तर्फे माजी नगराध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी यांचे पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला डॉ गणेश राठोड, सुहास सावंत, पांडुरंग जाधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमांतर्गत असंख्य महिला तथा लाभार्थ्यांना माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तथा अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर आदी मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.

तसेच सर्वसामान्यांच्या लोककल्याणसाठी देशाचे लोकप्रिय धाडसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली

तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या सहकार्यातून जनसामान्यांपर्यंत तळागाळातील अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी कटीबद्ध राहुन प्रामाणिक प्रयत्न करू असे सुतोवाच माजी नगराध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी यांनी यावेळेस व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम